ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पाब्रेकिंगमहाराष्ट्र

स्वामीज मसाले यांच्या संचालिका रूपाली ताई यांच्या शी दिलखुलास गप्पा

अहमदनगर

रुपाली शिर्के .. शिक्षण १० वी झाले. राहणार भोसरी पुणे. माझा व्यवसाय स्वामीज स्पाइसेस महिला गृहउदयोग.

हा स्वामीज मसाले व्यवसाय आता भोसरी मध्ये प्रत्येक घरा घरात पोहचला आहे.‌या व्यवसाय मध्ये आता माझ्या सोबत १५० ते २०० महिला जोडले आहेत.या व्यवसायाचे ट्रेनिंग मी स्वतः चिपळूण मधून घेतले. या व्यवसायाचा फक्त २ वर्षाचा अनुभव आहे. पण या २ वर्षाच्या बेस वर मी खूप महिलांना जोडले गेले.

लग्न २००९ साली झाले. पण घरातुन कसलाच सपोर्ट नाही आणि नव्हता. या व्यवसायात अडचणी खुप आल्या.म्हणजे महिलेला एक आधार पाहिजे असतो त्या सोबत एक आर्थिक मदतीची आवश्यकता असते. हा आर्थिक सपोर्ट वेगवेगळ्या आमच्या महिला गटांतून फंड जमा करून झाला. त्या नंतर फक्त महिला एकत्र येऊन चालत नाही. माल तयार केला की तो वेळेत कस्टमरांना पोहचवणे. त्या साठी महिलांना सांगणे कधी मी स्वतः गाडी वर माल पोहचवत असे. अजुन ही करते हे काम.

हा व्यवसाय रूपाली ताई महिलांना एकत्र घेऊन करण्याच्या पाठीमागे हा उद्देश की ग्रामीण महिला शहरी महिला एकत्र येऊन आठवडे बाजार , वेगळे वेगळे महोत्सव स्टॉल च्या माध्यमातून मार्केट मध्ये येतील. त्यांच्या प्रोडक्ट ची मार्केटिंग करतील. आणि लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या प्रकारचे हाताने घरगुती पद्धतीने बनवलेले , मसाले आणि इतर चांगल्या प्रतीचे फूड केमिकल , कलर, कोणते ही प्रीजरवेटीव्ह पदार्थ न घालता तयार करून विकत आहे.‌

या सोबत रूपाली ताई १२ – १३ वर्ष पासून वेगवेगळ्या संघटनांची काम करत आहे. रूपाली ताई महिलांसाठी खास काय काय कार्यक्रम करतात…

योगाच्या फ्री बॅचेस, मेडिटेशन  फ्री वर्कशॉप,
फ्रीडम लाईफ फाउंडेशन चे वेगवेगळे महिलांचे प्रोग्रॅम,
मुलांसाठी मोफत बालसंस्कार वर्ग,युवा उद्योजक यांच्या बिझनेस फोरमच्या माध्यमातून श्री मार्गदर्शन आणि सपोर्ट, आठवडे बाजारातून महिलांना माल त्या सोबत प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे,महिलांना फ्री ईडीपी ट्रेनिंग देणे, श्री ज्ञान विकास केंद्र यांच्या माध्यमातून सेवेन डे फ्री वर्कशॉप, केक वर्क शॉप, तसेच पोलीस संघटनेच्या माध्यमातून ऑल पुण्यामध्ये विविध सेवेचे उपक्रम…

या व्यवसायात समाधानी असून पुढे तो मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे. त्यांचा छंदच आहे की कोणत्या माध्यमातून निःस्वार्थी सेवा, डान्स, वाचन, लिखाण, महिलांना वेगवेगळ्या माध्यमात प्रोत्साहन करणे. आणि महिलांनी पुढे येणे.त्या साठी फॅमिली सपोर्ट चांगला पाहिजे. पुढे जाण्यासाठी महिलांनी पहिले स्वःता वरती ठाम विश्वास ठेवून काम करावे. ते सत्याच्या मार्गावर राहून सेवेचा भाग ठेवून करणे आपण व्यवसाय करतो. म्हणून कोणाची आपल्या मुळे फसवणूक होता कामा नये.

आपण आपला व्यवसाय हा लाॅंग टर्म करण्यासाठी आपण व्यवसाय चे काही नियमाचे पालन करावे . नेहमी सकारत्मकता ठेवून प्रगती साठी मार्केट परिस्थिती समजून घेऊन स्वताला अपडेट ठेवावे. रोज नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द असावी. आणि आपला व्यवसाय वरती आणण्यासाठी वेगवेगळी पध्दती, माध्यम समजून त्या चे ट्रेनिंग घ्यावे.

रूपाली ताई यांना ७ -८ पुरस्कार ही मिळाले आहेत.
पण आपल्याला यशाबरोबर कामातून आनंद मिळणे गरजेचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांना AR न्यूज च्या मुख्य संपादिका श्रुती बत्तीन-बोज्जा यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे