ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कसारा घाटात बसचा थरारक अपघात मिनी बस तीन वेळा पलटली 21 जण गंभीर जखमी..

अहमदनगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

मुंबई – नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या महामार्गावर मिनी बसचा भीषण अपघात झाला असून, या अपघातात २१ जण जखमी तर, ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.मिनी बस चालकाचा ताबा सुटल्यानं हा धक्कादायक अपघात घडला आहे. बस चालकाचा ताबा सुटल्यानं बस ३ वेळा उलटली. ज्यामुळे मिनी बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटात हा अपघात घडल्याची माहिती आहे. कसारा घाटातील चिंतामणवाडी मिनी बस उलटली. मिनी बस चालकाचा ताबा सुटल्यानं मिनी बस उलटली असल्याची माहिती समोर आली आहे.मिनी बस तीन वेळा उलटल्यानं बसमधील प्रवासी गंभीर झाले आहेत.

प्रवास करत असलेल्या प्रवाशांमध्ये २१ जण जखमी झाले आहेत. तर, ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. बसमध्ये आणखीन किती प्रवासी होते? याचा तपास सुरू आहे. अपघातग्रस्त कुटुंब मुंबईहून सिन्नरला एका लग्नाच्या कार्यक्रमाला जात होते.

अपघातग्रस्त रूग्णांना स्थानिकांनी तातडीनं जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी मिनी बस चालकाचा अपघात घडला कसा? या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान आणखीन कुणाचा अपघात घडला आहे का? याचाही तपास सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे