ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी

काही दिवसांपूर्वीच राज्यातील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी ही घोषणा केली. भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा यांची उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार यांची महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोषाध्यक्षपदी किरीट बन्साळी, युवा मोर्चा अध्यक्षपदी दीपक सिंह यांची वर्णी लागली आहे. तर उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मुंबईच्या प्रवक्तेपदी अनिकेत निकम, निरंजन शेट्टी, अजय सिंह, सुमिता सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई प्रदेश उपाध्यक्ष

किरण शेलार

रवी राजा

अभिजित सामंत

पंकज यादव

अमरजित मिश्रा

मुंबई प्रदेश महामंत्री

राजेश शिरवडकर

पवन त्रिपाठी

श्वेता परुळेकर

विनोद शेलार

मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष- किरीट बन्साळी

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष- दीपक सिंह

भाजप मुंबई प्रदेश प्रवक्ते

अनिकेत निकम

निरंजन शेट्टी

अजय सिंह

सुमिता सिंह

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे