
एक कोटीच्या लाच प्रकरणातील पसार असलेला मुख्य आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला अकरा दिवसानंतर अटक करण्यात आली आहे. अभियंता वाघ मुंबईहून धुळ्याच्या दिशेने जात असताना नाशिकजवळ त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय होण्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणी अभियंता अमित किशोर गायकवाड याची यापूर्वीच न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. मात्र, उपअभियंता वाघ दहा दिवसांपासून पसार होता.
त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर निर्णय होण्यापूर्वीच त्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर आले आहे.