ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढील 4 दिवस तुफान पाऊस

अहिल्यानगर

दक्षिणेकडून उत्तरेकडे सरसावलेल्या मान्सूनने उत्तरेकडील राज्यांमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. हिमाचलमध्ये पावसाने हाहाकार उडाला असून भूस्खलनामुळे 129 रस्त्यांवरील वाहनांचे वाहतूक थांबली आहे. बिहार उत्तराखंड झारखंड मध्य प्रदेश व राजस्थानसारख्या राज्यांना पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातही पुढील 4 दिवस दमदार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे हायअलर्ट देण्यात आले आहेत.

राज्यभरात आज मराठवाड्यासह पश्चिम व मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालन्यासह परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली भागात पाऊस झाला. विदर्भात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिमसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडला.

पुढील चार दिवस पावसाचे

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

आज संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट असून रायगड ठाण्यातही येलो अलर्ट आहे. पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.

1 जुलै –  रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती नागपूर भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.

2 जुलै –  सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच कोल्हापूर सातारा पुणे व नाशिक घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई ,पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट

3 जुलै – रायगड रत्नागिरी तसेच सातारा व पुणे घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व नाशिक घाट परिसर, संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

4 जुलै – चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, उर्वरित विदर्भात यलो अलर्ट, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेडसह तळकोकण व पुणे, सातारा व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट..

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे