माधुरी महेश पडवळ यांच्या माधुरीज् डेकोरेटीव्ह हॅण्डमेड प्रोडक्ट्स च्या संचालिका यांच्या शी दिलखुलास गप्पा
डोंबिवली, मुंबई

मी माधुरी महेश पडवळ. राहणार – डोंबिवली, मुंबई.
माझा व्यवसाय आहे माधुरीज् डेकोरेटीव्ह हॅण्डमेड प्रोडक्ट्स.
माधुरी ताई मुळच्या डोंबिवली च्या आहेत. त्या डोंबिवली मध्ये महेश एन्टरप्राईज या नावाने त्यांचे प्रोडक्ट्स ओळखले जातात.
माधुरी ताईंना डेकोरेटीव्ह हॅण्डमेड प्रोडक्ट्स बनवायची आवड होती. म्हणून त्यांनी साॅफ्ट टाॅईज बनवण्याचा क्लास केला. पण साॅफ्ट टाॅईज सोबत त्यांना आकर्षक हॅण्ड मेड डेकोअर प्रोडक्ट्स ची कल्पना सुचली.
घरगुती जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी 2015 मध्ये स्टाॅल लावत आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. सुरवातीला थोडा इनव्हेस्टमेंट चा प्रोब्लेम होता. सुरुवातीला 2 , 3 हॅण्डमेड डेकोरेट प्रोडक्ट्स बनवायला घेतले जसे की डेकोरेटीव्ह रांगोळी, तोरण, हॅंगींग प्रोडक्ट्स. याची मार्केटिंग करण्यासाठी दिवाळी, दसरा, संक्रांत निमित्त स्टाॅल लावायला लागले.त्यामुळे मैत्रिणी, नातेवाईक यांच्या मार्फत माउथ टु माऊथ पब्लिसिटी व्हायला लागली. मग हळूहळू मला ऑर्डर्स मिळत गेल्या. पण हे फक्त डोंबिवली पुर्तच माझे प्रोडक्ट्स जायला लागले.
माधुरी ताईंची इच्छा होती की माझे प्रोडक्ट्स फक्त डोंबिवली पुर्तच न राहता संपूर्ण महाराष्ट्रात जायला पाहिजे. म्हणून त्यांनी AR न्यूज मिडिया च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले प्रोडक्ट्स पोहोचले जातील या उद्देशाने त्यांच्या ब्राईंगला सुरुवात केली.
माधुरी ताई पुढे म्हणाल्या की घरातुन सपोर्ट मिळण हे खुप महत्वाचा पार्ट असतो. मला माझ्या सासूबाई, नवरा, मुली, आई, बहिण या मला खूप सपोर्ट करत आहेत. जेणेकरून माझ्या प्रोडक्ट्स ची पब्लिसिटी व्हायला पाहिजे.
माधुरी ताई सर्व महिला वर्गाला सांगत आहेत की शिक्षण किती असले तरी चालेल त्या चा फायदा करून आपण स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी काही तरी नक्की प्रयत्न करावे.
माधुरी ताई शेवटी म्हणाल्या की महिलांसाठी हे AR न्यूज मिडिया नी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यांचा सर्व महिलांनी सपोर्ट घ्यावा.