ब्रेकिंगमहाराष्ट्र
बारावीचा निकाल वेळेत लागणार

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जाहीर केले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर बहिष्कार मागे घेत असल्याचे शिक्षक संघटनेने जाहीर केले.
शिक्षकांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठ पंधरा दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. यानंतर शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला.
या घोषणेमुळे शिक्षण मंडळापुढील अडचण दूर झाली आहे. आता राज्यातील बारावीचा निकाल वेळेत लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे.