ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मनपायुक्तांचं फ्लेक्स मुक्त शहराचं धोरण लईच वरील व्यक्ती व्यक्ती पाहून किरण काळेंनी साधला निशाणा

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

नुकतेच मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर फ्लेक्समुक्त करणार असल्याचं धोरण जाहीर केलं. अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई केली जाईल असे सांगितलं. मात्र काही तास उलटले नाही तोच काँग्रेसने मनपाच्या गलथान कारभारावर सवाल उपस्थित केला आहे.

प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये लावण्यात आलेल्या राजकीय अनधिकृत फ्लेक्स वरून हेच का मनपा आयुक्तांचं फ्लेक्समुक्त शहराचं धोरण ?, असा जाहीर सवाल करत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी निशाणा साधला आहे.

किरण काळे म्हणाले की, शहराचं बॅनरबाजीमुळे विद्रूपीकरण होत आहे. हे थांबवत शहर स्वच्छ केल पाहिजे. मनपान जाहीर केलेल्या धोरणाच आम्ही काँग्रेसकडून निश्चितपणे स्वागत करतो. मात्र मनपाच धोरण हे सर्वांसाठी समान नसून सत्ताधारी राजकीय पक्षांना यातून सूट देण्यात आली आहे. म्हणूनच इतर राजकीय पक्ष तसेच व्यावसायिक जाहिरातींचे फलक मनपाने काढले खरे. मात्र काहींना यातून मनपाने सूट दिली आहे. किरण काळे पुढे म्हणाले की, आयुक्तांनी सांगितलं होतं की इथून पुढे शहरात फ्लेक्स लावण्यापूर्वी मनपाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. परवानगीचा क्रमांक संबंधित फ्लेक्सवर छापावा लागेल. तो न छापता फ्लेक्स लावला गेल्यास फ्लेक्स छपाई करणाऱ्या प्रिंटर्सवर देखील गुन्हा दाखल केला जाईल. ज्यांचे फ्लेक्सवर फोटो, नावे आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जातील. आता मनपा या राजकीय फ्लेक्स बाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमक दाखवणार काय ?, असा जाहीर सवाल किरण काळे यांनी आयुक्त डांगे यांना केला आहे.

किरण काळे यांनी म्हटले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांच स्मारकाचआणि पुतळ्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या ठिकाणी फ्लेक्सचा बाजार भरला आहे. मनपाने ही जागा तात्काळ फ्लेक्समुक्त करत रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे. फ्लेक्सबाजीच्या छायाचित्रात मागे मनपाच्या प्रलंबित नाट्यगृहाचा भगनावस्थेतील सांगाडा दिसत आहे. काँग्रेसने यापूर्वी देखील पोलखोल करत या ठिकाणी तळीरामांच्या भरलेल्या अड्याचं ओंगळवाण चित्र मनपा समोर मांडलं होतं. मात्र अनेक दिवस उलटूनही हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

कालच या जागेची पाहणी शहराच्या लोकप्रतिनिधींनी करत लवकरच हे काम पूर्ण होईल असे म्हटले होते. यावर निशाणा साधताना किरण काळे म्हणाले की, काम लवकर होईल असं आजवर लोकप्रतिनिधी मागील सुमारे सात ते आठ वर्षांपासून सांगत आहेत. आश्वासन नको कृती करा.

नाट्य, साहित्य, संगीत कलाकार आणि रसिकांची मागणी पूर्ण करा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा जाहीर इशारा किरण काळे यांनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे