ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी यांच्या पत्नी जशोदा बेन यांनी घेतले बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन

अहिल्यानगर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदा बेन मोदी यांनी सोमवारी सायंकाळी बुऱ्हाणनगरच्या पुरातन तुळजाभवानी मंदिरास भेट देऊन तुळजाभवानी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

तसेच देवीची आरती केली. यावेळी मंदिराचे पुजारी भगत परिवाराच्या वतीने अॅड. विजय भगत व अॅड. अभिषेक भगत यांनी जशोदा बेन यांचे स्वागत केले तसेच देवीचा प्रसाद व साडी चोळी देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी यशोदा बेन यांचे नातेवाईकही त्यांच्या समवेत होते.

जशोदा बेन मोदी यांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनाने मोठे समाधान त्यांनी व्यक्त केले. यावेळी मंदिराचा पुरातन इतिहास भगत परिवारच्या वतीने यशोदा बेन यांना सांगण्यात आला. त्यांनी मोठ्या कुतूहलाने सर्व माहिती ऐकली. त्यामुळे भारावलेल्या यशोदा बेन यांनी मनोभावे देवीचे दर्शन घेत आरती केली.

 

यावेळी अॅड.अभिषेक भगत म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदा बेन मोदी यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेतल्याचे मोठे समाधान व आनंद भगत परिवाला झाला आहे. त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्यांचा शांत स्वभाव व साधे राहणीमानाने आम्ही प्रभावित झालो आहोत.

यावेळी दुर्गा भगत, किरण भगत, कुणाल भगत, सुभाष भगत, राजेंद्र भगत, कविता भगत, अंकिता भगत, वैभवी भगत, सुनंदा भगत, वृषाली भगत, संकेत भगत, अजिंक्य भगत, रोहन भगत, अक्षदा भगत, वेद, वेदिका, शिवानी व भगत परिवारातील सदस्य उपस्थित होते.

तसेच भाजपाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर काळे, विजय काळे, भरत चौधरी व भीमराज महाले आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे