अहिल्यानगर मधील पेशवाई श्रीमंत दालना चा सातवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील पेशवाई श्रीमंत दालनाचा सातवा वर्धापन दिनानिमित्त आयोजित खास महिलांसाठी सौ. भाग्यवती कार्यक्रम ताल आणि खेळ.. सख्यांचा आनंदाचा सुवर्णमेळ.. सेलिब्रेटी अँकर, सिंगर – संदीप पाटील यांच्या सोबत बायकांनी खूप धमाल मस्ती केली..

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर माननीय राहुल दत्तात्रय येमुल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली..
उपस्थित पाहुणे मा. सौ. धनश्री सुजय विखे, रणरागिणी महिला मंडळ अध्यक्षा मा. सौ. ज्योती अमोल गाडे, मा. सौ. शितल ताई जगताप, महापौर मा. सौ. मीनल महेंद्र (भैय्या) गंधे (महिला बालक मंडळ, अहिल्यानगर), मा.सौ. प्रिया शिरीष जानवे (भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष), मा. सौ. वंदना विलास ताठे (नगरसेविका),मा. सौ. दिपाली नितीन बारस्कर (नगरसेविका), मा. सौ. रोशनी आकाश त्रिंबके (नगरसेविका), मा. सौ. रूपाली संदीप दातरंगे (नगरसेविका),मा. सौ. वैशाली श्याम नळकांडे (नगरसेविका), मा. सौ. संध्या बाळासाहेब पवार (नगरसेविका), मा. सौ. प्रियंका आठरे, (PSI) भरोसा सेल, अहिल्यानगर, मा. सौ. कल्पना चव्हाण (API) तोफखाना पोलिस स्टेशन, मा. सौ. पूनम श्रीवास्तव (API) कोतवाली पोलिस स्टेशन, मा. सौ. रूपाली निखिल वारे (समाजसेविका), मा. सौ. माधुरी सुभाष लोंढे (समाजसेविका), मा. सौ. संगीता महेंद्र बिज्जा (समाजसेविका), मा. सौ. सोनाली मनोज दुल्लम (समाजसेविका), मा. सौ. शैला राहुल कुलकर्णी (अभिनेत्री) यांचे सत्कार करण्यात आले..

सुरुवातीपासूनच संदीप पाटील यांनी गेम्स ला सुरुवात केली.. त्यात विनर झालेल्या त्यात सहभागी झालेल्या महिलांना गिफ्ट देण्यात आले.. गाणी गप्पा, संवाद असा कार्यक्रम रंगात आलेला असताना महिलांनी डान्स करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला..


शेवटी फायनल ला जे 3 विनर्स होते.. त्यांच्या साठी मानाची पैठणी, क्राऊन असे गिफ्ट ठेवण्यात आले होते..
फायनल पर्यंत पोहोचलेल्या – १) साजी कमलाकर भट
२) शिल्पा अंकम, ३) जयश्री सोनवणे.
कार्यक्रमाचा शेवटी कुपन दाखवून प्रत्येकीला भेटवस्तू देण्यात आली..आणि जाताना बायका खूप खुश होऊन गेल्या..शेवटी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता झाली..




