ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर अर्बनच्या ठेवीदारांना ऑक्टोबर अखेर 65 टक्के रकमा परत

अहिल्यानगर

अवसायक गणेश गायकवाड यांची माहिती..

भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर 2023 रोजी रद्द केला होता. गेल्या दोन वर्षाच्या काळात थकीत कर्जाची वसुली प्रक्रिया वेगाने राबवून १५ ऑक्टोबर 2025 पर्यंत 2215 ठेवीदारांच्या 65 टक्के रकमा परत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ३५ टक्के रकमा परत करण्याचे नियोजन सुरू असून या रकमादेखील लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.

बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाल्यानंतर बँकेच्या दैनंदिन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने भाडेतत्त्वावर शाखा कार्यालय असलेल्या बँकेच्या सर्व शाखा बंद करण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला. त्याचबरोबर स्वमालकीचे कार्यालय असलेल्या शाखा बंद करून त्यांचे कामकाज मुख्य शाखेत वर्ग करण्यात आले. त्यामुळे बँकेच्या दैनंदिन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली.

याचबरोबर थकीत कर्जदारांकडील कर्ज वसुली, तारण मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव आदी प्रक्रिया वेगवान करण्यात आली होती. त्यामुळे जुलै २०२५ अखेर २२१५ ठेवीदारांना ५० टक्के रक्कम – ९६१६.०३ लाख रुपये तर १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत १५ टक्के रक्कम – २८८४. ६३ रुपये परत करण्यात आले आहेत.

ज्या खातेदारांनी आपली केवायसी कागदपत्रे अद्याप बँकेकडे जमा केलेली नाहीत त्यांनी तात्काळ ही कागदपत्रे आपल्या नजीकच्या शाखेत अथवा मुख्यालयात जमा करावीत. याचबरोबर थकीत कर्जदारांनी आपली थकबाकी रक्कम तात्काळ बँकेकडे भरून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे