ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला..

अहिल्यानगर

अहिल्यानगर मध्ये  एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी रात्री भिस्तबाग पडक्या महालाजवळ घडली.

या प्रकरणी बालाजी प्रकाश श्रीगादी (रा. लक्ष्मी टॉवर कॉलनी, तपोवन रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेरॉन सुरेश पंडीत, अॅलेक्स उर्फ जॉय नितीन सोनवणे (दोघे रा. डॉन बॉस्को कॉलनी), धीरज उर्फ जॅकी जॉन आवारी (रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी श्रीगादी हे आपल्या (एमएच १२ एमजी ०१२८) क्रमांकाच्या दुचाकीची सर्व्हिसिंग करून घरी परतत असताना, पाठीमागून आलेल्या चार जणांच्या गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यातील एकाने शिवीगाळ करत मारहाण केली. इतर तिघेही आले आणि त्यांनी रस्त्यावरचे दगडे मारली. यावेळी आरोपींपैकी एका युवकाने हातात असलेला लोखंडी कोयता दाखवत तुला मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी कोयत्यासारख्या धोकादायक हत्यारासह हल्ला केल्याने सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे