ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर महानगरपालिकेत भरतीचा मार्ग मोकळा,खासगी कंपनीकडे प्रस्ताव सादर

अहिल्यानगर

महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक अडचणींमुळे प्रशासनाने 130 पदांना कात्री लावत केवळ 45 तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे.

बिंदू नामवलीसह समांतर आरक्षण निश्चित करून पद भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी महापालिकेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी महापालिकेतील पद भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

कर्मचारी आकृतीबंध मंजूर झाल्यापासून आजतागायत मनपात रिक्त पदे भरलेली नाहीत. त्यामुळे विविध अभियंते, विद्युत पर्यवेक्षक अशा तांत्रिक कर्मचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत. महापालिकेने तांत्रिक पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करून परवानगी द्यावी, असा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला होता. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी देत 176 पदे भरण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर महानगरपालिकेने 134 तांत्रिक पदे भरण्याबाबत प्रक्रिया सुरू केली.

दरम्यानच्या काळात सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे महापालिकेच्या आस्थापना खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली. त्यामुळे महापालिकेने या पदभरतीला कात्री लावत अत्यावश्यक असलेली केवळ 45 तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला.

या पदांच्या सामाजिक आरक्षण निश्चितीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर मनपा स्तरावर समांतर आरक्षण निश्चितीही करण्यात आली आहे. आता पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी या शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी भरती प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहे.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे