ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आंदोलन.अभिषेक कळमकर व विक्रम राठोड आक्रमक

अहमदनगर - संगीता खिलारी, शहर प्रतिनिधी

नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद्य झाला असून नगरकरांना अक्षरशा जीव मुठीत धरावा लागत आहे. शहर तसेच उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले, मोठी माणसे जखमी झालेली आहे. रात्रीच्या वेळी तर रस्त्यावरून फिरणे ही कठीण झाले आहे.

याबाबत वेळोवेळी मनपा कार्यालय येथे निवेदने देण्यात आली आहे तरीही मनपाकडून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी पाऊले उचलली नसल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्यासोबत चर्चा करताना राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर समवेत शिवसेनेचे विक्रम राठोड, महिला शहर अध्यक्ष नलिनीताई गायकवाड, फारूक रंगरेज, सुदाम भोसले, नामदेव पवार, आसाराम कावरे, सचिन ढवळे, अंबादास बाबर, किरण सपकाळ, श्रावण काळे, फराज पठाण, सचिन नवगिरे, ससाने ताई, हेलन पाटोळे ताई, प्रशांत भाले, गिरीश जाधव, गौरव ढोणे, अनिस शेख, गणेश कळमकर, चैतन्य ससे, अभिषेक जगताप, अक्षय शेटे, राहुल घोरपडे, नितीन खंडागळे, अभिजीत अष्टेकर, गणेश झिंजे, सुनील भोसले, जेम्स अल्हाट, नरेश भालेराव, भीमराज कराळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, मनपाकडून भटक्या कुत्र्यांचा सुसळा रोखण्यासाठी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. प्रशासनाने सदर गंभीर विषयाची तातडीने दखल घ्यावी अन्यथा मनपाच्या आवारात भटके कुत्रे सोडण्यात येणार असून. शहरात व उपनगरात जवळपास १० ते १२ हजार भटकी कुत्री आहे.

रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडी पाहायला मिळतात अंधारात या झुंडी वाहन चालक पदचार्‍यांवर हल्ला करतात कुत्र्यांच्या भीतीमुळे अनेकांचे अपघात झाले आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी अघोषित संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण होते मनपा प्रशासनाकडून कुत्रे पकडणे आणि निर्वीजीकरण करण्यासाठी खाजगी संस्था नियुक्त केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष या संस्थेचे असे कोणतेही काम दिसून येत नाही त्यामुळे नगरकरांचा त्रास वाढत चालला आहे.

सध्या शाळा कॉलेज सुरू झाली आहे विद्यार्थी पायी किंवा सायकलने शाळेत येजा करतात त्यांनाही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे तरी मनपा प्रशासनाने या समस्येचे निराकरण करण्यासाठी ठोस कारवाई करावी अन्यथा अहमदनगर महानगरपालिकेमध्ये भटके कुत्रे सोडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे