ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

ऐतिहासिक मार्कंडेय मंदिरास शासनाचा तीर्थक्षेत्र देवस्थानाचा दर्जा मिळवून देऊ – आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ

नव्या वर्षाची सुरवात मंदिराच्या कामाने करण्याचा पद्मशाली समाजचा उपक्रम कौतुकास्पद आहे. मोठे ऐतिहासिक महत्व असलेल्या भगवान मार्कंडेय महामुनींचे हे मंदिर हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

या मंदिराचा जीर्णोद्धाराचा निर्णयही स्वागतार्ह आहे. यासाठी कितीही खर्च येऊ द्या. मी तुमच्या पाठीशी आहे. या ऐतिहासिक देवस्थानला शासनाचा तीर्थक्षेत्र देवस्थानाचा दर्जा मिळवून देण्यासाठी निश्चीत प्रयत्न करू.

तसेच जिल्हा नियोजन मंडळाकडूनही देवस्थानाला निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आ.संग्राम जगताप यांनी देऊन मंदिराच्या जीर्णोद्धार कामास जगताप कुटुंबाचाही हातभार लागेल, अशी ग्वाही आ.जगताप यांनी दिली.

१०० वर्षांहून अधिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलल्या पद्मशाली समाजाचे आराध्यदैवत श्री मार्कंडेय महानुनिंच्या गांधी मैदन येथील मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अहिल्यानगरचे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते व शहर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे प्रमुख उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात झाले. यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांनी मार्कंडेय महामुनींचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला.

यावेळी श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम, पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम (सर), माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, माजी नगरसेवक संजय चोपडा, उपाध्यक्ष बालराज सामल, सचिव प्रकाश कोटा आदींसह श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टचे व पद्मशाली पंचकमिटी विश्वस्त ट्रस्टचे पदाधिकारी, मोठ्या संख्यने पद्मशाली समजतील नागरिक व महिला उपस्थित होते.

आ.जगताप पुढे म्हणाले, शहराच्या वैभवात भर घालणारे मंदिर उभारणे जसे आवश्यक आहे तसेच उद्याच्या भविष्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी याठिकाणची शाळाही चांगल्याप्रकारे उभारणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मा.महेंद्र गंधे म्हणाले, अहिल्यानगर मधील मोठे ऐतिहासिक हे देवस्थान आहे. या मंदिराच्या उभारणीस पूर्ण सहकार्य करू. देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे. या दोन्ही सरकारांच्या सहकार्याने व आ.जगतापांच्या सहकार्याने मंदिराच्या उभारणीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ. नगर शहराच्या वैभवात भर घालणारे हे मंदिर सर्वांच्या सहकार्याने उभारू. 

यावेळी बाळकृष्ण सिद्दम यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाने ठराव करून रीतसर परवानगी दिली असून संस्थेच्या शाळांच्या उभारणी नव्या जागेत करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा इमारतीच्या उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. भीमराज कोडम यांनी पद्मशाली समाजाच्या वतीने भूमिका विषद करून छिंदम बंधूंनी मंदिर उभारणीसाठी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे काम पुर्णत्वाकडे जात आहे, असे सांगितले. माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी गेल्या एक वर्षात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी घेतले गेलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली.

प्रास्ताविकात मार्कंडेय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम म्हणाले, मार्कंडेय महामुनींच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने शहरातील सर्व पद्मशाली समाज एकवटला आहे. या मंदिराच्या कामास आजपासून प्रत्यक्षात सुरवात होणार असून एक वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. यासाठी आ.जगताप व महेंद्र गंधे यांनी शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे सचिव प्रकाश कोटा यांनी केले, आभार सुरेखा कोडम यांनी मानले. यावेळी श्री मार्कण्डेय मंदिर देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अजय म्याना, पद्मशाली पंचकमिटी विश्वस्त ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सब्बन, सरचिटणीस विनायक मच्चा, खजिनदार शंकर येमूल, पंचकमिटी विश्वस्त ट्रस्टचे माजी अध्यक्ष संजय वल्लाकटी, शंकर सामलेटी, विनायक गुडेवार, राजू म्याना , सुमीत इप्पलपेल्ली, गणेश बुरा , संजय चीप्पा, पुरुषोत्तम बुरा, सुरेखा ताई विद्ये, रत्नाताई बल्लाळ, सविता कोटा , स्नेहा छिंदम , उमा बडगु, भारती न्यालपेल्ली, अनिता कोंडा, सारिका सिद्धम, स्मिता म्याना ,ज्ञानेश्वर मंगलारप, बालाजी गोणे, रोहन येनगंदुल, महेंद्र यंगुल, हरी येलदंडी, विनोद म्याना, दीपक गुंडू सुनील कोडम, अमोल बोल्ली, कुणाल दुडगू, कृणाल बुरगुल, राहुल गुंडू देवीदास गुडा आदींसह पद्मशाली ज्ञाती समाज मंडळाचे सदस्य व पद्मशाली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे