ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

बोगस डॉक्टरवर करवाई करण्याची मागणी

पाथर्डी तालुक्यातील चितळेवाडी येथील एका बोगस डॉक्टरकडून मोहरी येथील एका गरीब कुटुंबातील महिलेच्या गुडघ्यावर चुकीचे उपचार केल्यामुळे संबंधित महिलेचा पाय काढण्याची वेळ आली.

याबाबत सदर बोगस डॉक्टरसह त्याला गावात आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर, साठे, कलाम विचार मंचच्या वतीने पंचायत समितीकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात पाथर्डी पं. स. गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, चितळेवाडी येथील एका बोगस डॉक्टरकडून मोहरी येथील एका गरीब कुटुंबातील महिलेच्या गुडघ्यावर उपचार करताना या बोगस डॉक्टरने सदर महिलेच्या मांडीला इंजेक्शन दिल्यामुळे सदर महिलेचा पाय काढण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे सदर बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी. याप्रसंगी फुले, शाहू, आंबेडकर, साठे, कलाम, विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, शेवगाव तालुका आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष सतीश मगर, महिला आघाडीच्या राज्यध्यक्ष उषाताई शिंदे, शबाना शेख, जिल्हाध्यक्ष प्रदीपभाऊ ससाणे, पाथर्डी तालुका महिलाध्यक्षा शबाना शेख रफिक शेख, प्रसिद्धीप्रमुख आनंद मगर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे