ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

सौ.अनिता नरेंद्र गुजर यांनी बालदिन निमित्त खूप छान लेख लिहिलाय..नक्कीच वाचा..

डोंबिवली

बालदिन शुभेच्छा…

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।

ज्याचे अंगी मोठेपणा । तया यातना कठीण ।।

तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।

खरचं संत तुकारामांच्या उक्ती प्रमाणेच लहान मुले ही देवाघरची फुले असतात असे म्हंटले जाते आणी ते खरे आहे. निरागस लहान बालके घरात असतात तेव्हा जग विसरुन त्यांच्यात रमण्यात जो आनंद असतो त्याची उपमा दुसर्‍या कशालाही देता येणार नाही. जेव्हा ती आपल्या बोबड्या वाणीने कुतुहल भरलेले प्रश्न विचारतात तेव्हा किती सुंदर वाटतात आणी त्यांच्याशी त्याच वाणीत बोलायला किती छान वाटतं, सगळी दु:ख कशी दुर पळुन जातात. झोपेत जेव्हा खुद्कन हसतात तेव्हा अगदी गोड वाटतात, म्हणे सटवाई आणी जोखाई त्याना हसवितात असे ऐकले आहे. आईवडिलाचे तर उगाचच डोळे भरुन येतात कधी कधी आपल्या पिलांना पाहुन. एक वेगळेच विश्व एक वेगळीच किमया त्या परमेश्वराची.

खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते.

शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं. आताच फास्ट लाईफ बघितलं तर आपलं बालपण आठवतं. किती वेगळे आणि मस्त होते ते दिवस. फार काही सोयीसुविधा त्यावेळी नव्हत्या. पण तरीही कधीही कसली कमी भासली नाही.

आजचं हे जीवन बघितलं तर वाटतं, आजची पिढीच्या मानाने आपण फारच नशिबवान होतो.हे दिवस कधी हातातून निसटून जातात कळतही नाही.वाढत्या वयाबरोबर माणसाच्या गरजा बदलत जातात. लहान मूल आणि वयोवृद्ध माणसं सारखीच असं म्हणतात. कारण जन्मानंतरची काही वर्ष जसं मूल आई-वडिलांवर अवलंबून असतं तसंच वार्धक्यात शरीर साथ देईनासं झाल्यावर परावलंबन वाढतं. वृद्ध माणसांना आपली काळजी आपल्या मुलांनी किंवा बरोबर असलेल्या इतर माणसांनी घ्यावी, असं वाटू लागतं. पण प्रत्येक वेळी सगळ्यांना हे शक्य होतंच असं नाही.पण विचार करा जरा आपल्याकडे वेळ नाही असे जर त्यांनी आपल्या बालपणी म्हटले असते तर आज आपण ज्या हुद्द्यावर पोहचलो तीथपर्यंत पोहचू शकलो असतो का ? त्यांच्यामुळे आज आपल्याला हे दिवस बघायला मिळते ही भावना लक्षात ठेवून घरातील वृद्धांना वेळ द्या. गरज आहे त्यांना आपल्या साथीची .तेव्हा आपल्या लहान मुलांना जपण्याबरोबर घरातील वृद्धांनाही जपा ….आणि हो, हे करताना तुमच्यात लपलेल्या बालकालाही जपा .मुलांमध्ये मूल होऊन जगा म्हणजे बघा किती अलौकिक आनंद लुटायला मिळतो म्हणूनच म्हणतात ना ‘बालपण देगा देवा’. वयाचे उत्तरार्ध म्हणजे वृध्दत्व म्हणजेच त्या वेळेचं त्यांचे बालपण असते.म्हणूनच हे वृद्ध व्यक्ती म्हणजेच लहान मुलांसारखी असतात. म्हणजेच लहान मुले ही देवाघरची फुले असतात.तेव्हा त्यांचं देवत्व जपा म्हणजे तुम्हीही आयुष्यात खूप सुखी रहाल.

सर्व बच्चे कंपनी आणि वयाने मोठे पण मनाने लहान असणाऱ्या सर्वांना बालदिनाच्या शभेच्छा..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे