ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अहमदनगर शहरात माझी माती माझा देश अभियान सर्वत्र उत्स्फूर्तपणे राबवले जात आहे – भैय्या गंधे

अहमदनगर - आगरकर मळ्यात माझी माती माझा देश अभियानास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सर्व उपक्रम व प्रकल्पात देशाच्या नागरिकांनाचा थेट सहभग करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पूर्ण भारतात माझी माती माझा देश हे अभियान राबवेले जात आहे. या अभियानामध्ये देशातील प्रत्येक भागातून नागरिक उत्स्फूर्तपणे अमृत कलशात माती जमा करत आहेत.

दिल्लीत जमा होणाऱ्या मातीमधून राष्ट्रपती भवनात एक मोठे उद्यान विकसित होणार आहे. नगर शहरात ही माझी माती माझा देश हे अभियान सर्वत्र उत्स्फूर्तपणे राबवले जात आहे. आगरकर मळा परिसरात महिला नेत्या रेखा विधाते यांनी हे अभियान प्रभावीपणे राबवत यशस्वी केले आहे, असे प्रतिपादन नगर शहर भाजपाचे विधानसभा प्रमुख महेंद्रभैय्या गंधे यांनी केले.

नगर शहर भाजपच्या नेत्या रेखा विधाते यांच्या प्रयत्नातून आगारकर मळा येथे माझी माती माझा देश अभियाना राबवण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो महिला व नागरिकांनी आणलेली माती अमृत कलशात जमा केली. यावेळी भैय्या गंधे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, ओबीसी आघाडीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, माजी नगरसेवक किशोर बोरा, संतोष गांधी, सुमित बटोळे, व्यंकटेश बोमादंडी, सिद्धेश नाकाडे, अॅड.श्रीकांत ताके, विजय गायकवाड, सौरभ भांड, मल्हार गंधे, ओम काळे, चंद्रकांत पाटोळे, अॅड.ऋग्वेद गंधे, उमेश बोरा आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात रेखा विधाते म्हणल्या, माझी माती माझा देश या अभियानामध्ये आगरकर मळा परिसरातील महिला व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या जवळील माती जमा केली आहे. या परिसरातील अनेक महिला केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहेत.

आयुष्यमान भारत, आभा कार्ड योजनेत अनेकांचा सहभाग झालेला आहे. भविष्यात भैय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त महिलांना अशा योजनांचा लाभ मिळवून देणार आहे.

यावेळी ज्योती बोरा, सविता वैद्य, सुभाष पडागळे, एकनाथ पाटील, राजेश कराळे, चंद्रकांत साळुंके, तनिष्का मुथा, सौ.भळगट, सौ.औटी, सौ.नगरकर, सौ.पंडीत, सौ.परदेशी, सोनाली दळवी आदींसह राधाकृष्ण भजनी मंडळाच्या सुधा गाडे व त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे