ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

राष्ट्रवादी शरद पवार गटा चे ता.अध्यक्ष मनोहर डाके यांचा रमेश आडसकर यांना जाहिर पाठिंबा

माजलगाव प्रतिनिधी - किसन भीमराव पवार

माजलगाव विधानसभा निवडणुकीत रंगत आली असुन प्रस्थापित पक्षांच्या उमेदवरांना या निवडणुकीतून हद्दपार करण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी शरद पवार गटा चे ता.अध्यक्ष मनहोर डाके यांनी माजलगाव मतदार संघातील अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांना पाठिंबा जाहीर केला असून प्रस्थापित पक्षांना हाबाडाच दिला आहे.

प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखविण्यासाठी आणि त्यांना राजकारणातून हद्दपार करण्याची आता खरी वेळ आली आहे अन् त्या साठी उपक्ष उमेदवारांना निवडून देण्यासाठी सर्वांनीच एकीने विचार पाहिजे असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटा चे ता.अध्यक्ष मनोहर डाके यांनी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी झालेला पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

माजलगाव मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेशर आडसकर यांनी माजलगाव मतदार संघातील प्रत्येक जाती धर्माच्या समाजातील लोकांची आज पर्यंत निस्वार्थपणे सेवा केली असुन आता त्यांच्या सेवेची परतफेड करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे प्रतिपादनही या वेळी त्यांनी केले. माजलगाव मतदार संघांतील जनतेने मला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन रमेशराव आडसकर यांनी केले आहे..

या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटा चे ता.अध्यक्ष मनोहर डाके यांनी पत्रकार परिषदेत घेवुन जाहीर पाठिंबा रमेश आडसकर यांना दिला असल्याचे जाहीर केले या वेळी त्यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे