ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सावेडीत ‘द बर्निंग कार’ चा थरार चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला

अहिल्यानगर

अजुन तरी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही मात्र सध्या रस्त्यावर धावत असलेली वाहने पेट घेण्याच्या घटना घडत आहेत.

शुक्रवारी (दि.७) अहिल्यानगर मध्ये सावेडी उपनगरातील एकविरा चौकात अशीच रस्त्याने जात असलेल्या एका स्कार्पिओने पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी शुक्रवारी दुपारी अहिल्यानगरमधील सावेडी उपनगरातील एकविरा चौकात संदीपनी अकॅडमीसमोर रस्त्याने जात असलेल्या एका स्कार्पिओ या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. वाहनातून अचानक धुराचे लोट येत असल्याचे पाहून चालकाने तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले.

तोपर्यत काही नागरिकंानी याबाबत अग्निशमन विभागास याबाबत माहिती दिली सुदैवाने वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. मात्र वाहनाने अचानक पेट कसा घेतला, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्यामुळे या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेमुळे वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वाहनचालकांनी आपल्या गाड्यांची वेळोवेळी तपासणी करूनच रस्त्यावर उतरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यन रात्री उशिरापर्यत याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे