ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महापालिका आयुक्त यांनी पदभार घेतात दुसऱ्याच दिवशी सकाळी शहरातुन काढली पदयात्रा पाहणी

अहमदनगर शहर प्रतिनिधी - सागर सब्बन

सक्कर चौक ते दिल्ली गेट वेशी पर्यंत पायी फिरुन घेतली कामाची पाहणी कायनेटिक चौकातील गर्बेज कलेक्शन सेंटर व अन्य अतिक्रमण हटविणार महापालिकेमध्ये आयुक्त श्री . यशवंत डांगे यांनी पदाचा कारभार स्वीकारल्या नंतर  सांगितले.

दुसऱ्याच दिवशी नगर शहरातील कचरा संकलन याची पाहणी केली. आयुक्त साहेब सकाळीच राहत्यावर आल्याने पालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

साफसफाई करणारे कामगार कचरा संकलन करणारे घंटागाड्यावरील चालक आणि स्वच्छता निरीक्षकांच्या त्यांनी चांगली झडाझडती घेतली.

शहर सुरू होण्याच्या आत सर्व स्वच्छ झालं पाहिजे यासाठी त्यांनी सर्वांच्या कान उघडनी केली. नगर शहर स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे यासाठी आपण यंत्रणा अधिक सक्षमपणे करणार असून घंटागाड्यांचे वेळापत्रक त्यासाठी अधिक मजबूत करणार आहोत. कचरा संकलन सकाळी , दुपारी, संध्याकाळी घंटागाडी द्वारे सोबत राञी पाहणी करून शहरातील कचरा उचलणाऱ्या उचलण्यात येईल.

असाच सूचना घण कचरा व्यवस्थापक विभागाला दिले आहेत. सक्कर चौकापासून त्यांनी प्रभात फेरीला सुरुवात केली त्या अगोदर कायनेटिक चौकातील गर्जेब कलेक्शन सेंटरची पाहणी केली सिना नदी घाट सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कडे मोठा निधी प्राप्त झाला आहे.

त्यामुळे येथील गर्जेब कलेक्शन सेंटर दुसरीकडे हरवण्याचा सूचना देण्यात आले आहेत त्यानुसार हे सेंटर अन्य ठिकाणी लवकरच हलवण्यात येईल असं त्यांनी सांगितले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पुढे माळीवाडा वेस , माणिक चौक , भिंगारवाला चौक , तेलिखुंट , नेता शुभाष चौक चितळे रोड चौपाटी कारंजा, दिल्ली गेट वेश या मार्गावरून त्यांनी अधिकारी त्यांच्यासोबत पायी फिरून ठीक ठिकाणी साफसफाई बाबत निर्देशन दिले.

रस्त्यावरील साफसफाई झाल्यानंतर दुकाने उघडतात आणि मग दुकानदार झाडलोट करून तोच कचरा पुन्हा रस्त्यावर आणून टाकतात. याबाबत संबंधितांना सूचना देऊन वारंवार अशा गोष्टी घडल्यास तत्काळ कारवाई करा व त्यांना दंड आकारणी करा असे आदेश देण्यात आले आहेत.

माळीवाडा वेशीजवळ कचराकुंडी बंद करून तो कचरा घंटागाडी द्वारे उचलण्याची कार्यवाही करण्यात आली.

दोन वर्षापासून तसेच स्वच्छ संरक्षण अभियान करून दाखविले त्याचप्रमाणे यावर्षी देखील या अभियान नगर शहर कुठेच कमी पडणार नाही  याचं आपण एक निर्णय केला असून यावर्षीही मांनांकन मिळून नगर शहराला भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे डांगे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे