
छत्रपती संभाजीनगरच्या मिरमिटा परिसरात ऐन सध्या सणासुदीचे दिवसात भेसळयुक्त बर्फी करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल १२ लख ८७ हजार ४०४ रुपयांचा माल पकडले.
या ठिकाणी ५९८ किलो भेसळयुक्त बर्फी आणि ती तयार करण्याची पावडर जप्त करण्यात आला आहे. सध्या संण सुरू आहे. त्यामुळे मिठाईला मोठी मागणी आहे.
हेच हेरून अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने मिटमिटा भागात काही लोक बनावट खवा आणि अन्नपदार्थ तयार करीत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार गावातील उस्मानिया कॉलनी, गट क्रमांक १२९ मधील प्लॉट क्रमांक ६८ येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकला.
भेसळयुक्त बर्फी तयार करत होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आली याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.