ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील शाळांना १४ दिवस दिवाळीच्या सुट्ट्या

मुंबई

राज्यभरातील बहुतांश शाळांमधील सत्र परीक्षा अखेरच्या टप्प्यात आली असून त्यानंतर २६ किंवा २८ ऑक्टोबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या सुरू होणार आहेत. यंदा शाळांना १४ दिवस सुट्ट्या असतील.

बहुतांश शाळा १२ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता असून काही प्राथमिक शाळा १६ नोव्हेंबरला भरतील. मात्र, राज्तयात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे शिक्षकांना सुट्ट्याच्या काळात निवडणूक प्रशिक्षणाला जावे लागण्याची शक्यता आहे.

राज्यभरातील अनेक विनाअनुदानित शाळांच्या सहामाही परीक्षा संपून विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. मात्र, अनुदानित व सरकारी शाळांमध्ये राज्य शासनच्यावतीने मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांचे मूल्यांकन सुरू आहे. ही मूल्यांकन चाचणी २५ तारखेला संपेल. त्यानंतर लगेचच किंवा २८ ऑक्टोबरपासून शाळांची सुटी सुरू होणार आहे.

या १४ दिवसांच्या कालावधीत विद्यार्थी दिवाळी सुटीचा आनंद लुटणार असले, तरी शिक्षकांच्या डोक्यावर निवडणूक प्रशिक्षणाची टांगती तलवार आहे. दिवाळीच्या काळात प्रशिक्षणाला जुंपू नये, अशी मागणी शिक्षक परिषदेसह अनेक शिक्षक संघटनांनी केली आहे.

या सुटीच्या काळातच सत्र परीक्षांचे मूल्यमापन करण्याचीही जबाबदारी शिक्षकांना पार पाडायची आहे. तसेच अनेक शिक्षक दिवाळीनिमित्त बाहेरगावी जात असल्याने त्याच कालावधीत प्रशिक्षण लावले, तर शिक्षकांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघटनांनी ही मागणी केली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे