नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीतील भाविकांना अल्पोपहारचे वाटप
अहमदनगर प्रतिनिधी

भाजप महिला मोर्चा व आराधना महिला बचत गटचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी पद्मशाली समिती समाज ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे चितळे रोड येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने स्वागत करुन भाविकांना अल्पोपहारचे वाटप करण्यात आले.
भाजप महिला मोर्चाच्या मध्य मंडळ अध्यक्षा सविता कोटा यांनी मिरवणुकीतील श्री मार्कंडेय महामुनींच्या पालखीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते अल्पोपहारचे वाटप करण्यात आले.
यावेळी योगिता ढुमणे, रेखा गरुड, रोहिणी कोडम, सारिका जंगम, जयश्री क्यातम, सविता कोटा, नंदनी विश्वकर्मा, संगीता क्यातम, प्राजक्ता सग्गम, रेणुका जिंदम, डॉ. रत्नाताई बल्लाळ, कुसुम शेलार, केसकर ताई, विजया धारा, AR न्यूज च्या श्रुती बत्तीन-बोज्जा, पुजा म्याना, सपना छिंदम, अजय लयचेट्टी, प्रशांत वईटला, राहुल सग्गम, गोरख कोडम, मयूर आकुबत्तीन, सूरज संदूपटला आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.