डॉ साईनाथ चिंता यांना मिळालेला डॉ.हॅनेमन जीवन गौरव पुरस्कार पद्मशाली समाजासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे….नारायण मंगलारम
अहिल्यानगर

पद्मशाली युवा शक्ती, पद्मशाली महिला शक्ति यांच्याकडून डॉ चिंता यांना गौरवपत्र देऊन सन्मान संपन्न..
एका कामकरी, कष्टकरी समाजातून व सुसंस्कृत कुटुंबातून येऊन आपण मारलेली कर्तृत्वाची उंच गगनभरारी आमच्यासाठी प्रेरणादायी. ब्रह्मांडनायक साईनाथ महाराजांचे नाव धारण करणाऱ्या आपण आपल्या जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आपल्या अंगी असलेल्या वैद्यकीय व बौद्धिक नैपुण्याच्या जोरावर डॉ सॅम्युअल हॅनेमन जनक असलेल्या होमिओपथी उपचार पद्धतीमध्ये आपण केलेले प्रयोग, प्रचार प्रसार व हजारो रुग्णांना दिलेला निरोगी जीवनदान यांची दखल घेत महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी तर्फे २०२४-२५ या वर्षासाठी “डॉ.हॅनेमन जीवन गौरव पुरस्कार” आपणास प्रदान करण्यात आला आहे.
ही बाब आपल्या बरोबर आपल्या पद्मशाली समाजासाठी ही अभिमानाची आहे….!!” असे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम म्हणाले. ते ‘पद्मशाली युवाशक्ती ( ट्रस्ट ) अहमदनगर, ‘पद्मशाली महिलाशक्ती’ अहमदनगर यांच्यावतीने डॉ साईनाथ चिंता यांना मिळालेल्या “डॉ.हॅनेमन जीवन गौरव पुरस्कार” मिळाल्याबद्दल केलेल्या सन्मान प्रसंगी बोलत होते.
यावेळी युवशक्तीचे अजय म्याना, दीपक गुंडू, योगेश म्याकल, सतीश चिंता, सुरेश मैड, श्रीनिवास एल्लाराम, गीता एल्लाराम यांच्यासह डॉ चिंता यांचे कुटुंबीय ही उपस्थित होते.
वैद्यकीय सेवेसारख्या गळेकापू स्पर्धेच्या क्षेत्रात काम करत असताना डॉक्टरांनी मिळवलेले यश, मारलेली मजल अनेकांना मार्गदर्शक आहे. मी स्वतः त्यांच्या अद्भुत उपचारांची अनेकवेळा प्रचिती घेतली आहे.
आपल्या व्यवसायावर निष्ठा आणि गुरूंवर श्रद्धा ठेवून आलेला रुग्ण पूर्णपणे बरा करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची एक रेषही हलू न देता ते त्यांचे कसब पूर्ण वापरतात आणि रुग्णाला पूणपणे बर करतात. …!!” असे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन करताना श्रीनिवास एल्लाराम सर म्हणाले..
“फाईव्ह जीच्या जमान्यात थ्री जी अर्थात गॉड, गुरू आणि ग्रेस वर विश्वास असणारा मी. आईवडिलांचे संस्कार आणि गुरूंचा आशीर्वाद याशिवाय काहीही शक्य नाही यावर माझा ठाम विश्वास आहे .
पत्नी, कुटुंबीय, मित्र परिवार यांच्यामुळे गेल्या बावीस वर्षांपासून सातत्याने रुग्ण सेवाचा घेतलेला वसा मनापासून जपण्याचा प्रयत्न केला. मनापासून केलेल्या कामाचेच हे फळ आहे.” असे सत्काराला उत्तर देताना डॉ साईनाथ चिंता म्हणाले.
वैद्यकीय बौद्धिक कौशल्याची सर्वार्थाने परीक्षा पाहणाऱ्या कोरीना काळात सरांचे काम मी अतिशय जवळून पाहिले आहे. आमच्या महावितरण च्या कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून सर्वप्रथम सरांनी आर्सेनिक अल्बम च्या गोळ्यांचे वितरण केले होते. त्यापूर्वी किंवा त्यानंतर ही गरजू लोकांना मदतीसाठी ते सातत्याने तत्पर असतात. पद्मशाली युवा शक्तीचे ते खऱ्या अर्थाने कधी ही समोर न दिसणारे पडद्या मागचे बॅकबोन आहेत.
त्यांच्या सेवेची दखल म्हणून मिळालेला जीवन गौरव पुरस्कार म्हणजे फक्त त्यांच्यात नव्हे तर आपल्या समस्त पद्मशाली समजाच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तूरा आहे…..” असे आभार प्रदर्शन करतांना युवा शक्तीचे अजय म्याना म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अजय म्याना, दीपक गुंडू, योगेश म्याकल, सतीश चिंता, सुरेश मैड, श्रीनिवास एल्लाराम, गीता एल्लाराम यांच्यासह डॉ चिंता यांचे कुटुंबीय यांनी विशेष परिश्रम घेतले.