
ग्रामीण व शहरी भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण व्हावे ही भावना मनात ठेवून संस्थापक विठ्ठलराव वाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य महिला बचत गट पतसंस्था, अ. नगर महिला बचत गटाची सहकारी पतसंस्थेची स्थापना जानेवारी २०२० मध्ये करण्यात आली.
संस्थेच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक गरजांसाठी कर्जवितरण केले जाते. संस्थेने ७५० बचत गटांना सुमारे ७.५ कोटींचे कर्ज वितरण करून महिला सबलीकरणात मोलाचे योगदान दिले आहे. आज दिनांक 10 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी चैतन्य महिला बचत गटाचे सहकारी पतसंस्था अहिल्यानगर येथे कर्ज वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मा.संजय गर्जे साहेब , सुखदा हॉस्पिटलच्या संचालिका स्रीरोग तज्ञ डॉ.मीनाक्षी करडे , स्नेहालय चे कार्यकारी अध्यक्ष मा.श्री अनिल गावडे, मार्गदर्शक श्री.जनार्दन लिपणे , चैतन्य उद्योग समूहाचे संचालक श्री.अजय गावडे व, शुभम वाडगे ,मार्गदर्शक रामचंद्र मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर मीनाक्षी करडे यांनी महिलांना त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांवर बोलते केले .त्याचप्रमाणे महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणते बदल केल्याने त्यांचे जीवन निरोगी होईल याबाबत उत्तम मार्गदर्शन केले. महिलांनी सकस आहार कसा शिजवला पाहिजे व स्वतः कसा घेतला पाहिजे याबाबत त्यांनी उत्तमरीत्या माहिती सांगितली. त्याचप्रमाणे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मा.संजय गर्जे यांनी महिलांना व्यवसाय विषयक, त्याचप्रमाणे शासनाच्या महिलांसाठी असलेल्या योजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
श्रीगोंदा व अहिल्यानगर शाखेतील उपस्थित महिलांना कर्ज वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सुमारे २४० महिलांना १.५ कोटींचे कर्ज वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे महिलांचे दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येक कर्जदार सभासदाला प्रत्येकी तीन किलो साखर वाटप करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेतील कर्मचारी यश कासलीवाल व रीमा घंगाळे यांनी केले . तर प्रास्ताविक संस्थेच्या चेअरमन सौ. मेघना गावडे यांनी केले. आभार संचालिका तनुजाताई लिपणे यांनी मानले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीगोंदा व अहिल्यानगर शाखेचे सर्व कर्मचारी वृंद दादासाहेब सकट ,दिपाली गुरूड ,सुशील शिंदे ,अक्षय खरात ,दिनेश तागड अश्विनी मुळे ,अमोल गावडे ,कैलास विरकर ,प्रज्ञा हुंडेकरी , अश्विनी राऊत ,गुणवरे स्वाती ,कदम शैला, ओमकार वाघमारे ,अक्षय ओहोळ , तुषार दांडेकर ,सुरेश घोडके ,चेतन काळे ,महेंद्र जाधव ,किरण दूतारे , वर्षा साळवे व पद्मा डोंगरे यांनी अथक परिश्रम घेतले.