ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महिला मंडळ शाळेत मातापालक सभा आणि महाभोंडल्याचे आयोजन

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील दिल्लीगेट येथील परिवर्तन प्रतिष्ठान संचलित बालक मंदिर महिला मंडळ शाळेत शनिवार दि.५ ऑक्टोबर २०२४ रोजी माता पालक सभेत महाभोंडल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून माननीय सौ रेखाताई शुक्ल व प्रमुख अतिथी म्हणून माननीय पोलीस अधिकारी सायली भिंगारदिवे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.

या प्रस्तावाच्या मंजुरीबद्दल पदाधिकारी, माता पालक, शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांकडून जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करण्यात आले. महिला मंडळ शाळा ही मराठी वाचवा या तत्त्वावर प्रामुख्याने काम करते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ . रेखाताई शुक्ल यांनी प्राचीन काळातील सती अनसुया यांच्यापासून ते अलीकडच्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व कल्पना चावला यांच्यापर्यंतच्या कर्तबगार स्त्रियांची माहिती दिली.

पोलीस अधिकारी सायली भिंगारदिवे यांनी पालकांना मुले व आई वडील यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण मनमोकळा सुसंवाद असलाच पाहिजे. मुलींनी समाजात निर्भयपणे , सावधपणे वागले पाहिजे , हे आवर्जून सांगितले.

यावेळी नवरात्रीनिमित्त खास महाराष्ट्रीयन परंपरेनुसार भोंडल्याची मराठी गाणी सादर करण्यात आली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन माननीय मुख्याध्यापिका सौ अस्मिता शूळ यांनी केले.

आभार सौ वैशाली सातपुते यांनी मानले. सौ . सीमा कवाष्टे यांनी फलक लेखन केले व सूत्रसंचालन निरुपमा देशपांडे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे