ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

नवरात्री विशेषब्रेकिंगमहाराष्ट्र

मंडई येथे अंभ्रूनी धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न

पुणे

सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही धनलक्ष्मी प्रतिष्ठाण, मंडई येथे शारदेय नवरात्रौ उत्सवाचे आयोजन केले आहे, सायं ५ वाजता ढोल-ताशांच्या गजरात धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठापना आणि अभिषेक भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. पांडुरंगजी बलकवडे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

आपल्या प्रतिष्ठान ला विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच गरजूंना मदत स्वरुपात केलेली लक्ष्मीसेवा याला २० वर्षांची परंपरा आहे, यंदा प्रतिष्ठान २१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे, आपण वर्षभर अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतो,

यंदा आपण महिलांचे श्रीलक्ष्मी सूक्त पठन, नवदुर्गा सन्मान तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेत आहोत.

सदर कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब अमराळे, युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, तुषार पठारे, आनंद खन्ना, ऋषि सनस, सचिन चारोली, आशिष हिंगमिरे तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे