स्व.प्रमोद महाजन यांच्या विचारांचा, राजकीय डावपेचांचा व ध्येयधोरणांचा नव्या कार्यकर्त्यांनी अभ्यास करावा – महेंद्रभैय्या गंधे
अहमदनगर

माजी केंद्रीय मंत्री व भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी आपले पूर्ण जीवन राष्ट्र सेवेसाठी समर्पित केले होते. विशाल दूरदृष्टी असलेले स्व.महाजन यांच्या कार्यकाळातच देशात भाजपची घौडदौड सुरु झाली.
त्यांच्या जीभेवर सरस्वतीचाच वास असल्याने त्यांचे वक्तव्य कायम प्रभावी व प्रेरणादायी ठरले. प्रमोद महाजन यांनी पक्षातिल सर्वसाधारण कार्यकर्त्यास कायम बळ दिले. त्यामुळे अनेक नेते घडले आहेत. नगरशी त्यांचा प्रेमाचा जिव्हाळा होता. अशा महान राष्ट्रनेत्या पासून खुपकाही शिकण्यास मिळाले आहे. भाजपच्या नव्या कार्यकर्त्यांनी स्व.प्रमोद महाजन यांच्या विचारांचा, राजकीय डावपेचांचा व ध्येयधोरणांचा अभ्यास करावा, असे आवाहन शहर भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्रभैय्या गंधे यांनी केले.
माजी केंद्रीय मंत्री स्व.प्रमोद महाजन यांच्या जयंती शहर भाजपाच्या वतीने गुलमोहररोड येथील संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी शहर भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्रभैय्या गंधे यांनी स्व.महाजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर काळे, शशांक कुलकर्णी, सुमित बटोळे,लक्ष्मिकांत तिवारी, माणिक जपे, ओंकार काळे, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख, बाळासाहेब तागड, जितेश पापडेजा व राजेश हजारे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात ज्ञानेश्वर काळे यांनी स्व.प्रमोद महाजन यांच्या जीवनपट उलगडत नगरमधील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.