अहिल्यानगर शहरात कोतवाली पोलीसांची धडाकेबाज कारवाई
अहिल्यानगर शहर प्रतिनिधी - सागर सब्बन

अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी घेवुन जाणाऱ्या गोवंशीय जिवंत जनावरे व एक टेम्पो सह एकुण ६,६५,००० रुपये किंमतीचे..
दि.१९/१२/२०२४ रोजी पहाटे च्या सुमारास मा. पोनि प्रताप दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, अहिल्यानगर शहरातील लिंक रोड येथे कल्याण रोड ते हॉटेल रंगोली कडे जाणाऱ्या रोड मार्गे येथे अज्ञात इसम हे कत्तल करण्याकरीता व त्यांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा रितीने दोरीने दाटीरेटीमध्ये एका पांढरा रंगाच्या अशोक लेलँड मालवाहतूक टेम्पोमध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंशीय जातीचे जनावर घेवुन जाणार आहे. अशी गुप्त माहीती मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाला सदरबाबत माहिती कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या त्याप्रमाणे सदर रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढ-या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचा क्रमांक एमएच १६ ए.वाय ६२८० हे संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने सदर वाहनास थांबवुन त्यावरील चालकास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव-१)शहजहाँ अब्दुलकलीम कुरेशी, वय 30 वर्षे, रा. बाबा बंगाली, शाळा नं. 4 जवळ, झेंडीगेट, अहिल्यानगर, 2) समीर बाकर चौधरी, वय 32 वर्षे, रा. फर्स इंप्रेशन दुकानाचे मागे, नालबंद कुंट, अहिल्यानगर असे सांगून सदर टेम्पोचे पाहणी केले असता त्यामध्ये सहा गोवंशय जनावरे मिळून आली सदर जनवांरा बाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली असता पिकअप वाहनामध्ये १,६५,०००/-रु किंमतीचे ६ मोठ्या गोवंशीय जनावरे तसेच ५,००,०००/-रु किंचे पांढ-या रंगाची अशोक लेलँड कंपनीचा मालवाहतूक टेम्पो असा एकुन ६,६५,०००/-रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्याचेविरुध्द कोतवाली पोस्टे गुरनं १३३६ /२०२४ भारतीय न्याय संहिता 2023 चे क. 271, 3(5), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. 1995 चे सुधारीत कायदा 2015 चे कलम 5 (अ). 9 सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधि 1960 चे कलम 11 सह महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 119 प्रमाणे पोहेकाँ रियाज इनामदार यांचे फिर्यादीवरुन् गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोहेकॉ संदीप पितळे हे करीत आहेत. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती सो, यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सो,पोहेकॉ/ योगेश भिंगारदिवे, ए.पी. इनामदार, संभाजी कोतकर संदीप पितळे,दिपक मिसाळ, राजेंद्र पालवे, सचिन लोळगे यांच्या पथकाने केली आहे .