ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर एमआयडीसीत उद्योजकाला अपहरण करून मारहाण…

अहिल्यानगर

प्लॉटच्या व्यवहारातून एका उद्योजकाचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी एमआयडीसी परिसरात घडली. महेश सुरेश गावडे (वय 30 रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे त्या उद्योजकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून निखिल राजकुमार लून (रा. नवजीवन कॉलनी, मार्केटयार्ड जवळ, अहिल्यानगर) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश यांची एमआयडीसीमध्ये शिवशक्ती एंटरप्राईजेस कंपनी आहे. कंपनीच्या कामाकरिता त्यांनी निखिलकडून 2021 मध्ये 10 लाख रुपये घेऊन त्या बदल्यात स्वत:च्या नावावर असलेल्या प्लॉटचे साठेखत करून दिले होते.

त्यानंतर दोन वर्षात महेश यांनी संपूर्ण पैसे व्याजासह परत करून हा सर्व व्यवहार मिटवून टाकला होता. मात्र त्यानंतरही निखिल त्याच्या नावावर असलेला साठेखत केलेला प्लॉटचा व्यवहार रद्द करण्यास टाळाटाळ करत होता. म्हणून महेश यांनी याप्रकरणी कोर्टात दावा दाखल केला होता. मात्र तरीही निखिल हा वेळोवेळी महेश यांना दमदाटी करून प्लॉट माझ्या नावावर करून दे असे धमकावत होता. मंगळवारी महेश आणि त्यांचे मित्र निंबळककडे जात असताना निखिलने एका चारचाकीतून येऊन महेश यांच्या दुचाकीला चारचाकी आडवी लावली. खाली उतरून आजच्या आजच मला प्लॉटची खरेदी करून दे व माझ्या विरूध्द कोर्टात व उपनिबंधक कार्यालयात दिलेली तक्रार मागे घे नाहीतर तुला आज जिवंत सोडणार नाही, तुझा काटाच काढतो, असे म्हणत महेश यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे