ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

18 ते 35 वर्षे वयोगटातील लोकांना दरमहा दहा हजार रुपये मिळणार ! सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ कुणाला मिळणार ?

अहमदनगर

या योजनांची अनेकांना माहिती नसते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर वर्तमान शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार राज्य शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी मुख्यमंत्री योजनादूत नेमले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू देखील झाला आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक इत्यादींसाठी सरकारकडून शेकडो योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र यातील काही योजनांचा पात्र असूनही सर्वसामान्यांना फायदा होत नाहीये.

कारण की या योजनांची अनेकांना माहिती नसते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर वर्तमान शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार राज्य शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी मुख्यमंत्री योजनादूत नेमले जाणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे हा मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू देखील झाला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. या उपक्रमांतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना दरमहा कमाल दहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

अशा परिस्थितीत आता आपण मुख्यमंत्री योजनादूत या उपक्रमा संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या उपक्रमात कोण सहभागी होऊ शकतात, याची पात्रता आणि कागदपत्रे इत्यादीबाबतचा आढावा घेणार आहोत.

कसे आहे योजनेचे स्वरूप

या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार योजनादूत नियुक्त करणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला एक अन शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने योजना दूत नियुक्त केले जाणार आहेत.

या उपक्रमांतर्गत संपूर्ण राज्यभर एकूण ५० हजार योजनादूतांची नियुक्ती होणार आहे. म्हणजेच 50 हजार तरुणांना या उपक्रमांतर्गत रोजगार मिळणार आहे. पण या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही फक्त सहा महिन्यांसाठी राहणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन मिळणार आहे.

पात्रता काय आहेत ?

या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील अधिवास असणारे उमेदवार पात्र राहणार आहेत. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारच फक्त यासाठी पात्र राहतील. कोणत्याही शाखेचा पदवीधर अन संगणकाचे ज्ञान असणारा उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे. उमेदवाराकडे स्वतःचा अद्ययावत स्मार्ट फोन आणि आधारसंलग्न बँक खाते सुद्धा असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठं करणार ?

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

कोण कोणती कागदपत्रे लागतील?

आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, विहित नमुन्यातील हमीपत्र अशी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे