ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र

गणपती बाप्पा मोरया विशेष आरास प्रदर्शन 2024

अहमदनगर - डाॅक्टर रत्ना गणेश नजन यांचा खुपच आगळा वेगळा महत्वपूर्ण संदेश नक्की वाचा..

नाव – डाॅक्टर रत्ना गणेश नजन 

पत्ता – साई डेंटल क्लिनिक,  संकल्प अपार्टमेंट, यशोदा नगर कमान, पाईपलाईन रोड,  सावेडी, अहमदनगर 

देखावा – एकदंत पर्यावरण पूरक बाप्पा..

संदेश – एकदंत बाप्पा सांगतो….

वैतागतो मी ध्वनी प्रदूषण झगमगाट याने. तुझा- माझा कुटुंबाचा संवाद या डेकोरेशन, Video च्या नादात काही होत नाही. पाहुणा ना मी, मग बस जवळ, जरा हितगुज – गप्पा गोष्टी करू. तुझ्या हिताचे सांगतो बघ. नीट लक्ष देऊन ऐक.

घे तुझ्या बागेतील माती, दे मला आकार मी गोल मटोल, नाही पडणार तुला त्रास, मग दे मला स्वच्छ पाट बसायला, अनवाणी चाल, गवतातून आण दूर्वा आणि फुलं दोन चार

माझ्यासाठी नको ओरबाडू झाडांचं सौंदर्य वारंवार. माझ्या बरोबर तुझ्याही आरोग्याची होईल वाटचाल, दररोज साध्या गरम जेवणाचा दे मला प्रसाद. म्हणजे माझं आणि तुझं आरोग्य राहील साथ.

रात्री झोपताना तोंड, दात साफ करा. जेवणानंतर चूळ भरा. म्हणजे दात स्वच्छ निरोगी राहतील.

सकाळी फिरायला जा. व्यायाम करा. कमीत कमी कचरा होईल अस बघा. कचर्‍याचे नीट व्यवस्थापन करा.

रोज पहाटे उठव मला तुझ्या ओंकारध्वनीने. संध्याकाळी दे मला मंत्रपुष्पांजली आणि कर शंखनाद मग पावित्र्य आणि सोज्ज्वळता येईल तुझ्या घरात व मनात. मला विसर्जन पण हवं तुझ्याच घरात विरघळेन मी छोट्या घागरीत पण मग मला पसरव तुझ्या बगिच्यात,त्यावर प्रत्येक वर्षी लाव एक छानश रोप. मग त्याच रुपात मी रुजेल, बहरून तिथेच थांबेन म्हणजे लक्ष राहील तुझ्या घरात. तू अडचणीत सापडल तर, येता येईल क्षणात.

गणपती बाप्पा मोरया…

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे