ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसामाजिक

पुणे शहर पद्मशाली पंच कमिटी विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी समितीची सर्व संमतीने निवड

पुणे

महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे महानगर पुणे असून हे महानगर शैक्षणिक औद्योगिक विज्ञान तंत्रज्ञान दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर आहे या महानगरात पद्मशाली लोकांची साधारण लाखाच्यावर लोकसंख्या असून ब्रिटिशांच्या काळात आपल्या पद्मशाली समाज सुधारकांनी पद्मशाली समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पद्मशाली पंच कमिटी भवानी पेठ येथे स्थापन केली..

दिनांक ३१/८/२०२४ रोजी पुणे शहर पद्मशाली पंच कमिटीची सर्वसाधारण सभा ३१ ऑगस्ट २०२४ रोजी पद्मशाली विठ्ठल रखुमाई रखुमाई मंदिर ११२४ भवानी पेठ पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.

या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष व कार्यकारी समितीचे सदस्य निवडण्याबाबत चर्चा करण्यात आली चर्चेनंतर असा ठराव करण्यात आला की, पुणे शहर पद्मशाली पंच कमिटी अध्यक्ष व कार्यकारणी समिती सदस्य सर्व समितीने निवडण्यात यावे.

पुणे शहर पद्मशाली पंच कमिटीची १/ सप्टेंबर/२०२४ रोजी दुपारी बारा वाजता कार्यकारी समितीची बैठक होऊन अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तसेच या बैठकीत पद्मशाली पंच कमिटी पुणे शहर विश्वस्त मंडळ निवड निवडण्यात आले .

सरपंच पदावर श्री रविंद्र महादेव रच्चा यांची निवड केली. विश्वस्त मंडळाचा कालावधी दहा वर्ष असून कार्यकारणी समितीचा कालावधी पाच वर्षे आहे.

विश्वस्त मंडळ

सरपंच रवींद्र महादेव रच्चा , विश्वस्त चिटणीस ज्ञानेश्वर रामचंद्र बोड्डू , विश्वस्त नंदकुमार गंगादास कुंदेन, संजय शिवाजी चिलका, राहुल दत्तात्रेय येमूल, मनीष दत्तात्रेय अंदे, महेश ज्ञानेश्वर यमजाल, सल्लागार वसंतराव अनंतराव येमूल, अशोक बलराम झंपाल, भरत रामचंद्र शेरला..

कार्यकारी मंडळ

अध्यक्ष संजीव नारायण मंचे ,उपाध्यक्ष राजू  वसंत गड्डम , प्रभाकर केशव कॅरमकोंडा, विक्रम श्रीपत विलासागर, सागर गोरखनाथ पासकंटी , सरचिटणीस सुहास नारायण मदनलाल सहचिटणीस राजेंद्र जगन्नाथ आडप खजिनदार गोपाल गंगाधर येमूल उप खजिनदार प्रभाकर गंजय्या दोंतुल हिशोब तपासणी राजेश नारायण मुल्का, उप हिशोब तपासणी उमेश परमेश्वर गज्जल, उत्सव प्रमुख संजय रघुनाथ इरमल उप उत्सव प्रमुख अमोल गोविंद कोलपेक, प्रसिद्धीप्रमुख प्रशांत लक्ष्मण दासरी, सदस्य विलास नारायण, जिंदम भास्कर मधुकर तन्नीर, अनुप अशोक वंगारी, अभिजीत नरसिंग अनमल, सागर गंगाधर आडेप, योगेश अशोक अंदे, गणेश विठ्ठलराव अंकम, श्रीकांत गोपाळ कटकम, गिरीश सदाशिव मठ्ठापेल्ली, विनोद नारायण दंडी, अविनाश विठ्ठल उपलंची, नरेश सुरेश येमुल, सचिन नारायण पलेर्ला, दिनेश वलसा, राजेश व्यंकटेश उप्परपेल्ली. नरेश श्रीनिवास पाचकंटी, सौ नंदा राजू गरदास, सौ अरुणा पुरुषोत्तम सापा, श्रीमती शुभांगी अमोल अंदे, रोहन प्रभाकर दोंतुल, सुहास चंद्रकांत मंचे.

महाराष्ट्र राज्यातून पद्मशाली समाजातील उच्चशिक्षित तरुण-तरुणी नोकरीच्या निमित्ताने पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आपले शहर सोडून या महानगरात स्थायिक होत आहे भविष्यात उच्चशिक्षित पद्मशाली तरुण-तरुणींची संख्या या शहरात मोठ्या प्रमाणात असणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सरपंच, विश्वस्त ,अध्यक्ष ,पदाधिकारी सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन..व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे