
इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन ह्युंदाई क्रेटाचे अनावरण
मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे दी ऑल न्यू ह्युंदाई क्रेटाचे अनावरण आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संचालक विजयकुमार गडाख, जनरल मॅनेजर राजू बेजगमवार, सेल्स मॅनेजर अजय मगर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दी ऑल न्यू ह्युंदाई क्रेटा या नवीन वाहनाच्या सेगमेंट मध्ये वाजवी दरात उत्कृष्ट सुविधांचा लाभ मिळणार आहे. ज्या सुविधा इतर स्पर्धक कंपन्यांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध नाहीत.