ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

आदेश बांदेकरांना हटवून शिवसेनेचे सदा सरवणकर सिद्धीविनायकाच्या अध्यक्षपदी

मुंबई

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना माहिम दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर या समितीचे अध्यक्ष होते. मात्र, आज शिवसेनेच्या सदा सरवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सरवणकरां कडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोललं जात होतं. अनेक दिवसांपासून तर्क वितर्क ही लावले जात होते. अशातच आज सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. शिवसेनेत असताना सरवणकरांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. माहिम, दादरचा विभाग शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं काम सदा सरवणकरांनी केलं आहे.

तसेच, सरवणकर सुरुवातीला नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर सरवणकरांनी शिवसेनेकडूनच आमदारकीची निवडणूक लढवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकरांनी ठाकरेंची  साथ सोडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कास धरली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे