
अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्याचे विविध प्रश्न प्रलंबित असून राज्य शासनाकडे सातवा वेतन आयोग व लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी मिळावी यासाठी अहमदनगर मनपा कर्मचारी संघटनेच्या वतीने नगर ते मुंबई मंत्रालय असा लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चामध्ये हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे दोन्ही प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची माघार नाही.
हा मोर्चा १७ ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा, आरोग्य, पाणीपुरवठा वर गेट वगळून पालिकेचे सर्व कामकाज ठप्प राहणार आहे.
त्यामुळे सोमवारी (दि.२) शहरामध्ये सकाळी साफसफाईचे काम न झाल्यामुळे सर्व कचऱ्याचे ढिग पहावयास मिळत आहे.