
आगामी विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता आणण्याच्या दृष्टीने भाजपचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्यात अगोदरच शिवसेनेचे तब्बल ४० आमदार सोबत आले आहेत.
आता ‘राष्ट्रवादी’चेही आमदार सोबत आल्याने भाजपला अधिक बळ मिळाले आहे. यातूनच भाजप दोन्ही निवडणुकांत आपले यशाचे मिशन फत्ते करण्याच्या तयारीला लागले आहे. त्यातच आता आणखी एका वृत्तामुळे भाजपला प्रचंड फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हावर लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.
शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये भाजपच्या नेत्यांची चिंतन बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
त्या ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे राज्यात लढविण्यात येणाऱ्या जागांबाबतही चर्चा झाली.