ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

खा. लंकेंच्या आंदोलनात महिला आक्रमक

अहमदनगर - संगीता खिलारी शहर प्रतिनिधी

कलेक्टर ऑफिस समोरच महिला आंदोलकांनी मांडल्या चुली

महाविकास आघाडी सरकारने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांची संख्या वाढली, तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले. नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत.

या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेश लंके जमिनीवर बसून आंदोलन करत आहेत. जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला, शेतकऱ्यांची भाषणे देखील या ठिकाणी सुरू आहेत. याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाजल्या.

खासदारांच्या पत्नी राणीताई लंके यांनीदेखील महिलांसोबत जेवण बनवलं, त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारला आहे. आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत, म्हणून आज आम्ही महिलांनी चुली पेटल्या आहेत.

आमच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना , आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून घालणार आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात अन्यथा हे आंदोलन रान पेटवेल असे देखील इथे बोलले जातय.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे