
पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौरभ अमराळे यांची वर्णी लागली आहे. इंडीयन युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी महाराष्ट्र युथ काँग्रेसच्या काही पदांसह विविध जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.त्यात पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सौरभ अमराळे यांच्यावर सोपवली आहे.
सौरभ अमराळे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेले १५ वर्षे कार्यकर्ता, उपाध्यक्ष ,वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही भरीव कामगिरी केली आहे.तसेच ते विविध संघटनांचे पदाधिकारी असून सामाजिक कार्यातही सदैव अग्रेसर असतात.
विशेषतः संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे पाहून त्यांच्यावर आता पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.