
नरेंद्र मोदींसाठी केलेल्या नवसपूर्तीसाठी सायकलप्रवास केला. नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा शपथविधी दिवशी मोदी भक्त ऋषिकेश गुंडला यांनी नगर ते शिर्डी सायकलवारी करून साईदर्शन केले.
देशाचा विकास व्हावा. यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असा नवस नगर येथील युवक ऋषिकेश गुंडला यांनी साईबाबांना केला होता. आज नवसपुर्तीसाठी त्यांनी नगर ते शिर्डी असा सायकल प्रवास करून साईदर्शन घेतले. या आधी ही पहिला सायकल प्रवास 27/05/2014 ला व दुसरा 30/05/2019 केला होता.आणि आता 09/05/2024 सायकल प्रवास केला.
याबाबत बोलताना गुंडला म्हणाले, “नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा मी साईबाबांकडे व्यक्त केली होती. माझी इच्छापूर्ण झाली. तर नगर येथून सायकलवरून शिर्डीत येईन व बाबांच्या समाधीचे दर्शन घेईन, असा नवस केला होता. आज नवसपुर्तीचा आनंद झाला आहे. माझे स्वप्न बाबांनी पूर्ण केले.
नरेंद्र मोदी पंतप्रधान यासाठी साईबाबांना नवसाची पूर्ती म्हणून नगर येथील ऋषिकेश गुंडला यांनी नगर ते शिर्डी असा सायकल प्रवास करून साईदर्शन केले.