ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

रिटायरमेंटनंतरही कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही; केवळ ₹२००० ची SIP, जमतील ₹३,५५,३३,८७९

जर तुम्ही खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आधीपासूनच नियोजन करण्याचा निर्णय योग्य ठरेल. अशावेळी गुंतवणुकीसाठी चांगला वेळ मिळतो आणि वृद्धापकाळात तुम्ही तुमच्या आर्थिक गरजाही भागवता येतील.

जर तुम्ही खासगी कंपनीत नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आधीपासूनच नियोजन करण्याचा निर्णय योग्य ठरेल. अशावेळी गुंतवणुकीसाठी चांगला वेळ मिळतो आणि वृद्धापकाळात तुम्ही तुमच्या आर्थिक गरजाही भागवता येतील. आजच्या काळात अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्हाला कंपाउंडिंगचा फायदा मिळतो. अशावेळी तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितके जास्त पैसे जोडता येतील..

म्युच्युअल फंड एसआयपी ही त्यापैकीच एक योजना आहे. ही बाजाराशी निगडीत असूनही ही योजना खूप लोकप्रिय झाली आहे. शेअरमध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा त्यात कमी जोखीम असते. तसंच, दीर्घकाळात रुपी कॉस्ट एव्हरेजींगचा फायदाही उपलब्ध आहे. एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्के मानला जातो. अशावेळी या योजनेच्या मदतीनं गुंतवणूकदारांचा पैसा मोठ्या प्रमाणात वाढतो. तुम्हाला हवं असेल तर एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही फक्त २००० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.

काय करावं लागेल? 

जर तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला नोकरीसोबतच त्यात ही गुंतवणूक सुरू करावी लागेल. समजा तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला निवृत्ती निधी तयार करण्यासाठी ३५ वर्षे मिळतील कारण तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. याशिवाय फास्ट मनी कमावण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागतं, ते म्हणजे तुम्हाला दरवर्षी गुंतवणुकीच्या रकमेवर १० टक्के टॉप-अप लावावा लागतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी २००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली असं समजू. तुम्हाला पहिल्या वर्षासाठी २००० रुपये जमा करावे लागतील आणि पुढच्या वर्षी १० टक्के रक्कम वाढवावी लागेल.

अशा प्रकारे तुमचा पगार वर्षागणिक वाढत असल्याने तुम्हाला दरवर्षी गुंतवलेल्या रकमेत १० टक्क्यांनी वाढ करू शकता.

असे जमतील ३,५५,३३,८७९ रुपये

२००० रुपयांपासून सुरू होणाऱ्या एसआयपीमध्ये १० टक्के वार्षिक टॉप-अप करुन ३५ वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक ६५,०४,५८५ रुपये होईल. सरासरी १२ टक्के परताव्यानुसार तुम्हाला केवळ व्याजातून २,९०,२९,२९४ रुपये मिळतील. गुंतवलेली रक्कम आणि व्याज मिळून ३५ वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण ३,५५,३३,८७९ रुपये होतील. तर या गुंतवणुकीवर तुम्हाला १५ टक्के दरानं व्याज मिळालं तर नफा जवळपास दुप्पट होईल आणि तुमच्याकडे एकूण ६,७०,२४,२१२ रुपये होतील.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे