ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुंबई होणार चकाचक

पार्किंग समस्या आणि अन्य सोयीसुविधांचा दर्जा सुधारणार

मुंबई शहरातील विविध नागरी समस्यांचा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतला आढावा

मुंबई शहरातील १४,००० शौचालयांची बांधकामे तातडीने करावीत, प्रतिदिन ५ वेळा शौचालय स्वच्छता करणे, मुंबई महापालिकेच्या  BMC सर्व उद्यानांमध्ये विविध सुधारणां सह सुरक्षा रक्षकांची दर्जोन्नती व मनोरंजनात्मक सुधारणा तसेच मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर भेडसावणाऱ्या सार्वजनिक पार्किंग समस्येबाबत योग्य त्या परिणामकारक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिकेच्या “नागरिक कक्ष” कार्यालयात महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासु, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या समवेत मुंबई शहरातील विविध नागरी समस्यांबाबत बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.

या बैठकीत मुंबईच्या विविध विभागातील रस्ता, गटारे, कचरा व्यवस्थापन, पदपथ इ. समस्यांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. तसेच महापालिका शाळांचे नुतनीकरण आणि पूर्णत: वापर सुरू करणे, निवृत्तीनंतर महापालिका कर्मचाऱ्यांचे ६० दिवसांत निवृत्ती वेतन मिळवून देणे, उद्यान सुधारणा, सार्वजनिक मनोरंजन ठिकाणे सुधारणा, महानगरपालिका रुग्णालय सुधारणा, आपला दवाखाना बद्दलच्या तक्रारी आणि सूचना, सार्वजनिक पार्किंग आणि इतर पार्किंग समस्या, महापालिका शाळांचे नूतनीकरण करण्याबरोबर त्यामध्ये कौशल्य विकास, अभ्यासिका व पाळणाघर या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे