
पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक कै.गुरुवर्य बत्तिन यांची १३६वी जयंती प्रा. बत्तिन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालय येथे संपन्न झाली.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कै.प्रा.बत्तिन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्याल यांनी केले.उपशिक्षक रावसाहेब इंगळे यांनी आपल्या भाषणात गुरुवर्य बत्तिन यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण सिद्दम व प्रा.वीरभद्र बत्तिन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गुरुवर्य बत्तिन पोट्यन्ना शैक्षणिक , सामाजिक मंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटण्यात आला.
या समारंभास बत्तिन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम,सचिव प्रा.बाळकृष्ण गोटीपामुल , सदस्य रघुनाथ गाजेंगी, कुमार आडेप, शिवाजी संदुपटला, शेखर दिकोंडा, माध्यमिकचे प्राचार्य संदिप छिंदम व शिक्षक उपस्थित होते.आभार उपशिक्षिका सौ.शोभा बडगू यांनी व्यक्त केले.