ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

विधानसभा निवडणुक , नगर शहराच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा दावा

अहमदनगर

राज्यातील महाविकास आघाडीतील नगर शहराच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. शहर विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे यांच्या उपस्थितीत नगरमध्ये झालेल्या बैठकीत तशा मागणीचा ठराव करण्यात आला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगर शहर विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी या मागणीचा ठराव करण्यात आला.

यावेळी बोलताना विलास घोगरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. आघाडीच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाले. यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे.

आगामी विधानसभा निवडणूक आघाडी पूर्ण ताकदीने लढवणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. नगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. स्व. अनिल राठोड यांनी या मतदारसंघावर वर्चस्व ठेवले होते. त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात नगर शहर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिल, यासाठी आपण प्रयत्न करू. पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू. आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहील, यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.

शहरप्रमुख संभाजी कदम यांनी आढावा सादर करताना नगर शहराची जागा शिवसेनेला मिळावी, असा ठराव केला. त्यास विक्रम राठोड यांनी अनुमोदन दिले व सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंद – म्हणाले, गेल्या वीस वर्षांत शिवसेनेने चार महापौर दिले.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा खासदार झाला. त्यामुळे विधानसभा व महापालिका निवडणुकीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. विविध पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी संजय शेंडगे, अनिल बोरुडे, रवि वाकळे, हर्षवर्धन कोतकर, बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, योगीराज गाडे, श्याम नळकांडे, अमोल येवले, प्रशांत गायकवाड, विजय पठारे, दत्ता जाधव, सुरेश लोखंडे, संतोष गेनप्पा, दत्ता कावरे, दीपक खैरे, संग्राम कोतकर, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे