ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

४०० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.पद्मशाली युवा शक्ती ट्रस्टचा उपक्रम

अहमदनगर

गरजू विद्यार्थ्यांच्या जिद्धिला सलाम करत पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने गेल्या सात वर्षापासून ४०० विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात येत आहे. त्या मुलांना हे वाटप करुन खुप काही मोठ कार्य करतोय असे अजिबात नव्हते पण त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न असे योगेश म्याकल यांनी सांगितले.

गांधी मैदान येथील श्री मार्कडेय मंदिर येथे भगवान श्री माकैडेय यांची महाआरती करून पद्मशाली युवा शक्ती ट्रस्ट व पद्मशाली महिला शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने व दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीने ४०० गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप केले असे दिपक गुंडू यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सुमित इप्पलपेल्ली म्हणाले गेल्या सात वर्षापासून पद्मशाली युवा शक्ती ट्रस्ट विविध समाज उपयोगी कार्य करत आहेत. या वहीं वाटप उपक्रम अंतर्गत तोफखाना, दातरंगे मळा, शिवाजी नगर, रंगारगल्ली, चितळे रोड, श्रमिकनगर, पदमानगर, सिव्हील हाडको, शिमला कॉलनी नागरदेवळे भिंगार, नित्यसेवा या भागातील गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन वही वाटप चे कार्य केले आहे असे सांगून पद्मशाली युवा शक्तीच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, योग शिबिर, विद्यार्थ्यानंसाठी करिअर व्याख्यान शिबिरे, विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि तरुणाचे सत्कार असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात, असे त्यांनी सांगितले

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक गुंडू, सुमित इप्पलपेल्ली, योगेश ताटी, सागर बोगा, योगेश म्याकल, श्रीनिवास इप्पलपेली, नारायण मंगलारप, श्रीनिवास एल्लाराम, अजय म्याना, सागर आरकल, सुरेखा विद्ये, उमा कुरापट्टी, सारिका सिद्यम, निता बल्लाळ, लक्ष्मी म्याना, रेणुका जिंदम, सुनंदा नागुल यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे