फादर्स डे निमित्त हिरकणी सौ.अनिता नरेंद्र गुजर यांनी खूप छान भावुक लेख लिहिला आहे.
डोंबिवली

माझ्या जीवनाचे आश्वासक आधार…माझे बाबा,माझे सासरे.
वडील माझे चित्रपट गीतकार कै. अनंत जाधव आणि माझे सासरे ह.भ.प. अर्जुन गुजर यांच्या प्रेरणेमुळे गाण्याची, कवितेची कला जोपासली गेली. वडिलांचा जेवढा पण सहवास लाभला त्या अल्प काळात मी बरेच काही त्यांच्याकडून शिकले आणि कविता करण्याची आवड निर्माण झाली.
पुढे लग्न झाले आणि नशीब पहा किती बलवत्तर . माझे सासरे ह.भ.प. अर्जुन गुजर( असिस्टंट क्लेकटर ऑफ कस्टम) ह्यांनाही कविता करण्याचा छंद होता . वडिलांच्या मागे त्यांनी मला लिहिल्यासाठी प्रवृत्त केले. आज सासरे ही नाही राहीले माझे हे कौतुक बघायला ,पण मी आज जे काही आहे हे माझे पप्पा (वडील) आणि आमचे तात्या (सासरे) यांच्या मुळेच आहे,त्यांचाच आशीर्वाद आहे.
मी आणि माझे बाबा जगावेगळं आमचं नातं,
सहवास सुटला त्यांचा तरी अंतरात दरवळत रहातं..,!!
कातड्याच्या जोड्यांनेही पांग फिटणार नाही,
जन्मदात्याचे ऋण मरेपर्यंत माझ्यावर राही..!!
चित्रपट, गीतकार, कलाकार, त्यांचा वसा,
बाबा माझे साहित्यिक , चालवेन मी वारसा..!!
काव्यारुपी शिक्षण दिले जणू कल्पवृक्ष कन्येसाठी,
शिकवूनी केले सज्ञान आशीर्वाद त्यांचा माझ्यासाठी..!!
नावासम ते अनंत नम्रतेने नित्य झुके माझा माथा,
यशवंत, कीर्तिवंत,मूर्तिमंत रूप, अनु सांगे यशोगाथा ..!!