ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दारात आलेल्या भोंदू साधूचे मुलीसोबत दुष्क्रुत्य, गावकऱ्यांनी यथेच्छ चोपला, अहमदनगरमधील गावातील घटना

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला भिक्षा मागण्यासाठी आलेल्या भोंदू तरुणाने जवळ ओढून तिला लाज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी बाप व मुलगा असलेल्या दोघाभोंदू बाबांची यथेच्छ धुलाई केली.

त्या नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तेरा वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार नारायण आप्पा जाधव (राहणार बाबर नगर, पैठण नाका, अंबड जि. जालना) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील पिडीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही देवळाली प्रवरा परिसरात तीच्या कुटुंबासह राहते. सकाळी दहा वाजे दरम्यान पिडीत मुलगी तीच्या घरात एकटीच होती. त्यावेळी बाप व मुलगा असलेले दोन भोंदू बाबा भिक्षा मागण्यासाठी आले.

त्यांनी पाणी पिण्यासाठी मागून तिच्या घरी कोणी नाही हे पाहून मी थोडावेळ घरात बसतो असे सांगितले. त्याने बसण्यासाठी चटई मागीतली. त्यास बसण्यासाठी चटई दिली व त्यानंतर त्याने तुमचे ग्रहमाण फिरलेले आहे, मी तुला एक वस्तु देतो “असे सांगुन सदर मुलीला बोलावुन हात धरुन त्याचेजवळ ओढुन मिठी मारली.

त्यानंतर तीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पिडीत मुलीने आरडाओरडा केला असता भोंदू बाबांनी तेथून पळ काढला. परिसरातील काही तरुणांनी दोन्ही भोंदू बाबांना पकडून त्यांची यथेच्छ धुलाई केली.

दरम्यान या आरोपीस आरोपीला १४ दिवस न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याचे समजले आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पडोळे है करत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे