पुण्यात ढगफुटी, रेकॉर्डब्रेक पावसामुळे उडाली दाणादाण
पुणे - पुण्यात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. अनेकांनी लागलीच पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आडोसा घेतला होता.

शांत अन् निवांत असेलल्या पुणेकरांची आज चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून आले. पुण्यात अचानक मुसळधार पावासाला सुरुवात झाली अन् बघता बघता रस्त्यांना नदीचे रुप प्राप्त झाल्याचं दिसून आलं.
विजांच्या कडकडाटासह शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला असून ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं. आज संध्याकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे पुण्यात ३१ ठिकाणी झडपडीच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, या पावसानंतर जिल्हा प्रशासन व मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
पुण्यात अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. अनेकांनी लागलीच पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आडोसा घेतला होता. 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वीही पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला होता. शहरातील धानोरी, कात्रज, विमान नगर परिसरात पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं.
पुण्यात आज मुसळधार पावसाने पुणेकरांना चांगलंच झोडपल्याचं दिसून आलं. पुणे शहरातील रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी राज्यातल्या आजच्या दिवसातला सगळ्यात जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून शिवाजी नगर, अलका टाकीज चौक, कोथरुड, कात्रज, सिंहगड रोड यासह अनेक परिसरात रस्ते तुंबल्याचं दिसून आलं. पुणे शहरातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पुणेकर 2 तास वाहतूक कोंडीने संतापले होते.