ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरमधील नामांकित क्लासचा कामगार विद्यार्थ्यांच्या फी चे चार लाख घेऊन पळाला

अहमदनगर

अहमदनगर शहरात नगर आकाश बायजूस या नामांकित कंपनीचे क्लासची शाखा आहे. या शाखेमधील काम करत असलेल्या इसमाने विद्यार्थी व पालकांकडून क्लासच्या फी पोटी जमा केलेले ३ लाख ८५ हजार ४७७ रुपये कंपनीच्या बँक खात्यात न भरता पोबारा केलाय.

इतकेच नव्हे तर कंपनीने दिलेले २ लॅपटॉप, १ टॅब देखील नेलंय. एकंदरीतच त्याने ४ लाख ७५ हजार ४७७ रुपयांचा ऐवज घेवून पोबारा केल्याचा प्रकार नगर मध्ये समोर आला आहे.

याबाबत कंपनीचे मृत्युंजय तापेश्वर सिंग (रा. तपोवन रोड, नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन भागीरथ भटाटे (रा. गायकवाड एव्हेन्यु, प्रेमदान चौक, सावेडी) याच्या विरुद्ध कंपनीचा विश्वासघात केल्या प्रकरणी भा.दं. वि. कलम ४०६, ४०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आकाश बायजूस या नामांकित कंपनीची नगरमध्ये प्रेमदान चौक येथे गायकवाड एव्हेन्यु येथे शाखा आहे. या शाखेत सचिन भागीरथ भटाटे हा कार्यरत होता. त्याने डिसेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विद्यार्थी आणि पालकांकडून क्लासच्या फी पोटी जमा झालेले ३ लाख ८५ हजार ४७७ रुपये कंपनीच्या बँक खात्यात भरले नाहीत.

तसेच कंपनीने त्याला विश्वासाने कार्यालयीन कामासाठी दिलेले २ लॅपटॉप, १ टॅब असा ४ लाख ७५ हजार ४७७ रुपयांचा ऐवज घेवून पोबारा केला.

कंपनी व्यवस्थापनाने त्याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा संपर्क न झाल्याने शेवटी कंपनीच्या प्रतिनिधीने शुक्रवारी (दि.७) तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे